शेतकऱ्याने मका आणली थेट वैजापूर बाजार समिती कार्यालयात

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी): बाजार समितीचे प्रशासन लिलाव प्रक्रियेत व्यापाऱ्यांना पाठीशी घालून एकाच दर्जाच्या मकात शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप भायगाव येथील शेतकऱ्याने केला. एवढेच नव्हे तर या शेतकऱ्याने आपली पाच ट्रैक्टर मका थेट बाजार समितीच्या आवारात आणत रोष व्यक्त केला. या शेतकऱ्यासह इतर शेतकऱ्यांनी सचिव आणि सहाय्यक सचिवास घेराव घातला. सचिवास सचिव, लक्ष्मण पारसनाथ ठोंबरे असे आरोप करणाऱ्या मका उत्पादकाचे नाव आहे.

 लिलाव प्रकियेत दुजाभाव होत असल्याचा केला आरोप १७३६ रुपये भाव देण्यात आला. मग हा दुजाभाव का असा संतप्त सवाल मका उत्पादकांनी प्रशासनाला केला. मकाला १७०० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी लक्ष्मण ठोंबरे यांच्यासह मनोज नळे, विजय अंभोरे, उमेश उशीर, भावराव ठोंबरे, अरुण जाधवर, भावलाल जाधव या शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे व सहाय्यक सचिव एस. के. निकम या दोघांना घेराव सहायक घेराव घातला.

 त्यांना धारेवर धरले. यावर मोटे व निकम यांनी या शेतकऱ्यांना पाच  वाजता होत असलेल्या लिलाव प्रक्रियेत पुन्हा सहभाग नोंदवण्याची सूचना केली. मात्र ही सूचना मान्य न झाल्याने मकाचे पाचही ट्रॅक्टर समिती कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले. त्यांच्या मकाला लिलावात व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विटल १६१८ रुपये भाव देण्यात आला. 

शासनाने एफएक्यू दर्जाच्या मकासाठी प्रति क्विटल २४६० रुपये भाव जाहीर केला आहे. जोपर्यंत संचालक मंडळ यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत येथून ट्रॅक्टर हलवणार नाही अशी भूमिका मका उत्पादकांनी घेतली. दरम्यान, शनिवारी झालेल्या लिलावात ४६ वाहनांना १४०० ते १७०० रुपये प्रति बिंटल भाव मिळाला तर २६ वाहनांना १७०० ते १७३६ रुपये भाव मिळाला अशी माहिती बाजार समिती प्रशासनातर्फे देण्यात आली.